STORYMIRROR

सानिका कदम

Romance Others

4  

सानिका कदम

Romance Others

मी काहीतरी लिहावं....!

मी काहीतरी लिहावं....!

1 min
125

मी काहीतरी लिहावं

आणि तू ते वाचावं.......

दाटून आलेल्या ढगांनी

असच धुवादार बरसावं.....


तुझ्या आठवणीतं

मनातील मोरांनी ही नाचावं...

मादक अश्या त्या चाफ्यानी

पहाट होता होता उमलावं


तुला आठवताना फक्त

एकटक तुलाचं पहावं

प्राजक्ताने ही तेव्हा अंगणात

भान विसरून झडावं-.....


तु येणार या आनंदाने

सुगंधाने ही भरून वहावं

गज-यात गुंफण्यासाठी

तेव्हा मोग-यान ही फुलावं.....


तुझ्यासाठी मनाला

कितीदा फसवावं

काटयातून डूलणा-या

गुलाबाने ही खोटचं हसावं.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance