मी जिजाऊ बोलत आहे..
मी जिजाऊ बोलत आहे..
होय.. माझ्या लाडक्या लेकींनो
मी जिजाऊ बोलत आहे..
डगमगू नका, स्वतःला सावरा
मी तुमच्या पाठीशी उभी आहे.
नडेल त्याला आडवे करा
दाखवा तुमची शक्ती तुम्ही...
नका भिऊ कुत्र्या- मांजरासम
माझा वसा- वारसा चालवा तुम्ही..
नव्या युगाची नारी असता
का नराधमांना बळी पडता ?
समर्थपणे लढायचे सोडून
उगीच का अश्रू ढाळता ?
अबला म्हणून हिणवणाऱ्यास
होऊन दाखव आता सबला..
तुम्हीच दुर्गा -कालिका -चंडिका
लढून- झुंजून व्हा आजची शूरबाला..
खचू नका, रडू नका
सदा पुढे चालत रहा ..
लक्ष्मी- अहिल्या- सावित्रीची
लेक बनून जगात वावरत रहा ..
वेगळी ओळख निर्माण करा
पेलुनी तुम्ही हरेक आव्हान..
स्त्रीशक्तीचा जागर करुनी
नित्य व्हावा तुमचा सन्मान..
