STORYMIRROR

Sunita Anabhule

Inspirational

4  

Sunita Anabhule

Inspirational

मी एक नारी

मी एक नारी

1 min
544

मी एक नारी

सदा देते उभारी,

संसारी,घरी दारी,

अबोल प्रीत करी,

न अपेक्षा धरी,

स्वीकारी वा झिडकारी,

सर्वांसाठी सदा झटणारी,

स्वतःची चिंता न करी,

सर्वांची इच्छापूर्ती करी,

सुपेरवुमनची इमेज भारी,

जीवा पल्याड सांभाळणारी,

नात्यांच्या पदरा गुंफणारी,

सुख दुःखाची वाटेकरी,

रूढी परंपरांची गुलामगिरी,

निमूट साहते बेचारी,

तिजवाचून या संसारी,

अपूर्णत्व वाटे मज भारी,

बदल तू स्वीकारी,

क्रांतीची दे ललकारी,

सबलीकरणाची घे भरारी!!

मी एक नारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational