STORYMIRROR

Yogita Takatrao

Abstract

3  

Yogita Takatrao

Abstract

मी एक बिंदू

मी एक बिंदू

1 min
472

कोणी निर्मिले सारे

ग्रह, पृथ्वी अन् तारे

ह्या विश्वाची मी  

सूक्ष्म उत्क्रांति हो


मनीचे भाव माझ्या 

कोणी जाणले ना

ह्या ब्रम्हांडी मी एक

तेजोमयी बिंदू हो


कसे प्रगत झाले 

जीव ह्या तलाचे

ह्या स्पर्धांमध्ये सारे

जिव धावती हो


जुळले मी कणाने 

अदृश्य शक्ती ने

ह्या अध्यात्मतात 

विलिन सारा संसार हो


जिवांचा प्रवास त्यांस

झालरे अस्तित्वाची 

धडपड ह्या बिंदूं ची

होण्या स्थिर स्थावर हो


कशी होऊ उतराई

ह्या ऋणांची आभारी

भासते निराळीचं

मी ही एक प्रवासीच हो


सभोवताली माझ्या 

अद्भुतरम्य गोष्टी  

ही अनुभूती माझी 

विस्मयकारिता हो 


हा विश्वास माझा

मी आहे अनोखा

दिव्य चमत्कार ह्या 

अविष्कारी शक्ती चा हो


अचंबित झाले 

आश्चर्य मजं आहे 

ह्या भूतलावरची मी

एक अंशात्मक उत्पत्ती हो


हरखुनी मी गेले

चिंब गेले भिजुनी 

हे अंतर केले पार

दृढनिश्चयानेच हो


रोमांचित सफर

अनुभवली मनमुरादं

घेतला मनुष्य जन्म 

कसा हे वैश्विक कोडेचं हो


मी ही एक हिस्सा 

वैविध्यतेचा मी बिंदू 

मी जुडता ह्या विश्वास

लाभे मज पूर्णत्व हो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract