'मी' च्या मनाला झालाय कँसर
'मी' च्या मनाला झालाय कँसर
'मी' च्या झाल्या सर्व मेडिकल टेस्ट
पैसा झाला खर्च खुप
निदान काय करावे
हे न कळे तज्ञ डॉक्टरांना
आई होती साधी भोळी
अनुभव तीचा सांगत होता
काही झाले नाही याच्या शरीराला...
म्हणे शेवटच्या स्टेजचा कँसर झाला
नाव ही सांगता येत नाही त्याच्या कँसरचे
कारण दिसत नाही त्याच्या शरीराचा भाग
आईनेच मग निदान केले
संशयाने घेरलेल्या 'मी' च्या मनालाच झालाय कँसर!!!
मनालाच झालाय कँसर!!!
