मी भारतीय सैनिक
मी भारतीय सैनिक
गर्व नाही तर अभिमान मला मी भारतीय सैनिक
भारत भूमातेचे रक्षण मज आद्य आणि दैनिक
निधडया छातीवर झेलतो मी गोळयांचे वार
शत्रू कसाही असो कधीच मानली नाही मी हार ||1||
ना करतो मी प्राणाची पर्वा
भारत भूमातेचा पुत्र मी सर्वेसर्वा
माझ्या नसानसात भारतमातेची भक्ती
मी बलदंड अन् एकमेव अद्वितीय माझ्यात शक्ती ||2||
सहन करतो मी प्रहार अनेक
मला नाही दुजाभाव आहे सर्व एक
माझ्या हृदयाच्या स्पदंनात कोरलय मी मातृभूमीचे चित्र
मी आणि माझे सैनिक बांधव सज्ज आहे लढण्या वागेल जो विचित्र
रणभूमीत खेळतो लाल रंग रक्तरुपी होळी
कधी येईल सांगता येत नाही दुश्मनी गोळी ||3||
गोळी खाऊनही भरतो अंगात जय हिंद
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो धुंद
मायभूमीसाठी प्रिय आम्हा मरण
शेवटी मरता मरता सांगून जातो
प्राणाहुनही वंद्य मला भूमातेचे चरण ||4||
जय हिंद जय हिंद की सेना
