मी आहे
मी आहे
जिथे न आत्म-सन्मान
तिथं मी नाही
'हाय, हॅलो', म्हटलं
तर बिघडतं का काही?
नोकरीसाठी 'दान' देतात
तिथं मी नाही
'सी.व्ही. तुझा योग्य', म्हटलं
तर बिघडतं का काही?
रुपाला भुलणारे जिथे
तिथं मी नाही
'मन तुझे सुंदर', म्हटलं
तर बिघडतं का काही?
शब्दांचे जाळे जिव्हारी
तिथं मी नाही
'क्षमा कर', म्हटलं
तर बिघडतं का काही?
मैत्रीचा हात पुढे करतात
तिथं मी आहे
शब्दांना समजतात
तिथं मी आहे
पक्षी साद घालतात
तिथं मी आहे
द्वेष, लोभ टाळतात
तिथं मी आहे
मनातील भाव सारे
मी सांगू पाही
अशी स्वप्ने पाहिली
तर बिघडतं का काही?
