STORYMIRROR

Sanjay Gurav

Tragedy

3  

Sanjay Gurav

Tragedy

म्हटलं तर सोपं...

म्हटलं तर सोपं...

1 min
288

म्हटलं तर सोपं आहे सगळं

फॅशन बनून जातातच ना..,

फाटलेले कपडे आणि ठिगळं ?


म्हटलं तर सोपं आहे सगळं

संधी साधायला बसूनही मात्र

समाधिस्त ठरतात चक्क बगळं.


म्हटलं तर सोपं आहे सगळं

आयुष्यभर तिष्ठत ठेवणाऱ्याच

पिंडाला शिवतात चटकन कावळं.


म्हटलं तर सोपं आहे सगळं

कशाचं काय आणि फाटक्यात पाय

जगणं मरणं दाखवायचंच सोहळं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy