म्हणून पडताे पाऊस...
म्हणून पडताे पाऊस...
मी चिंब भिजावे
म्हणून पडताे पाऊस,
पडू नकाे धाे-धाे
रानात आहे ऊस...
मी चिंब भिजावे
पड जरा भिजपाऊस,
कशी अचानक बदलताे
पावसाची वेगळी कूस...
मी चिंब भिजावे
नुसता ओलवून जा,
राेपे गेली नासवून
कशी झाली ती वजा...
मी चिंब भिजावे
पडत जा शांत जरा,
डाेलू दे पीक जाेमात
माझी काळजी घे ईश्वरा...
