STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Classics

3  

Meenakshi Kilawat

Classics

महिमा ब्रह्मांडाचा

महिमा ब्रह्मांडाचा

1 min
287


अथांग महिमा ब्रम्हांडाचा वंदन शतशत करूया आकाशातील रविकिरणांचा महिमा ही गाऊया...!!


 पृथ्वीवरती अमृत बरसती दयाधन होऊनी

आसमानी मंडपातून झरे झरझर पाणीच पाणी...!!


अखंड भूमीची किमया कशी ही निसर्ग लीला

देई आसरा जगण्यासाठी अन् छाया या सृष्टीला...!!


तुषार येता मेघातूनी सजती इंद्रधनु गगनी  

देती साद खेळत हासत नवरंग उधळुनी....!!


 अनंत चैतन्य बहरे मातीच्या कणाकणातूनी

 समस्त जीव धन्य होई कर्तव्य उत्सवात रमुनी....!!


श्रद्धा ठेवूनी निसर्गावरती अणूरेणू सांभाळण्याला

लाखाने वृक्ष लावूनी तृप्त तृप्त करूया धरेला.....!!


या महिमेची उधळण करा पृथ्वीचे उपकार फेडूनि प्रामाणिक प्रयत्न करावा धरेला सुंदर सजवूनी....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics