महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले
ज्योतिबांसाठी ठेवली एक दाई,
एक वर्षाचेेच असताना वारली आई,
ज्योतिबा शिकूनी झाला मोठा,
मुलींसाठी बांधिला शिक्षणाचा ओटा,
सांगितले गोविंदरावास ब्राह्मणाने
शिक्षणामुळे बिघडतात म्हणे मुले,
यामुळेच घडले क्रांतीसुर्य
महात्मा ज्योतिबा फुले,
अगोदर केली फुला - फळांची शेती,
शिक्षण देऊनी बनविली मुलींची परिपक्व मती,
आधुनिकतेला दिली स्त्रीशक्तीची गती,
ज्योतिबांचे जन्मस्थळ असेे पुणे,
नाही ठेवणार आम्ही त्यांचे उणे,
कर्मकांडाचे धुतले निर्मळ धुणे,
सोडूनी सर्व नातीगोती,
महान कार्य पार पाडण्यासाठी,
सावित्री होती जीवनसाथी,
समाजातील दूर केल्या सर्वच जाती,
घरोघरी पेटविल्या ज्ञानाच्या वाती,
ते होतेे क्रांतीसुर्य अन् क्रांतीज्योती...