STORYMIRROR

Vrushali Vajrinkar

Inspirational

4  

Vrushali Vajrinkar

Inspirational

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
396

जिथे माउली जिजाऊ विरपुत्र शिवराय

तोच अमुचा महाराष्ट्र ...

नांदतो इथे संस्काराचा

शालीनतेचा झरा,

इथे आहे सह्याद्रीचे सौन्दर्य ,

विशाल समुद्र ,,

नतमस्तक होतो इथे

वारकरी पंढरीच्या दारी

महाराष्ट्रची परंपरा न्यारी...

नाकात नथ शोभते, पैठणी जरतारी

भाकरी पिठलं खाऊ सुखाने तर,

झणझणीत वडापाव भारी,

शेतकरी राजा इथला

इथे विद्येची माय सावित्रीबाई ,

इथे जन्मला क्रिकेटचा राजा सचिन

अनेक दिग्गज होऊन गेले,

भुलवणारी फिल्मी दुनियेची सवारी...

महाराष्ट्राची महती समजण्या , ऐकावे पोवाडे

संतांचे अभंग, वाचावी ज्ञानेश्वरी..

मला आवडतो महाराष्ट्र लय भारी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational