महामारीवर मात
महामारीवर मात
महामारीने तांडव केला झाला जीवांचा घात
सारे मिळुनी चला करू या महामारीवर मात
एक विषाणू घातक झाला संपर्काने बाधित झाला
बदलून गेले जगणे अचानक रोग नवा जन्मास आला
घरी राहुनी करू सुरक्षा आहे ही वैऱ्याची रात
सारे मिळुनी चला करूया महामारीवर मात
संसर्गाचे रोग भयानक मृत्यूचा ना चुकवी फेरा
राहू जागरूक ठेऊ निरोगी देशासह आपल्या घरा
देश रक्षणासाठी उचलू या माणुसकीचा हात
सारे मिळुनी चला करूया महामारीवर मात
स्वार्थ जरासा ठेऊ बाजूला धर्मरक्षणासाठी लढूया
देश आपुला पवित्र भारत विश्वरक्षणासाठी बघूया
दावू जगाला एकमताने ही माणूसकी ची जात
सारे मिळूनी चला करू या महामारीवर मात
निसर्गशक्तीचा करूया आदर नीतीचे हे काम करू
तथागताच्या मार्गानेची शांतीचा हो मार्ग धरू
युद्ध नको तर बुद्ध हवा ही महासत्तेची वाट
सारे मिळुनी चला करू या महामारीवर मात
भाऊसाहेब जंजिरेंनी परिस्थितीला जाणले
इंडोटेक च्या साह्याने "कोरोना किलर" आणले
महामारीवर लढण्यासाठी जागवला विश्वास
कोरोना किलरने करू या महामारीवर मात
