महामानव
महामानव
रत्न तेजस्वी बाबा तुम्ही
माता भीमाईच्या पोटी.
तुम्ही उद्धरील्या पिढ्या
जगामध्ये कोटी कोटी.
भारतरत्न झाले तुम्ही
केलीस कष्टाची साधना.
संविधान लिहिले तुम्ही
केली विद्येची आराधना.
हक्कासोबत ठेवा तुम्ही
कर्तव्याची सदैव जाण.
समानतेचा केला पुरस्कार
लोकशाही असे संविधान.
अन्यायाचा केला प्रतिकार
पेटविले महाडचे पाणी.
चवदार तळे सत्याग्रह
गातो भीम तुझी कहाणी.
ज्ञानाचे महासागर तुम्ही
प्रज्ञासूर्य प्रकाशला भूवर.
महामानव भारतरत्न किर्ती
तुमची चंद्रसूर्य आहे तोवर.
