महामानव
महामानव
हे भिमा,जन्माने लावला तुला कलंक,
अस्पृश म्हनुण मारत होते तुला डंक.
शुद्राला नाही मिळावे शिक्षण म्हनुण बहिष्कृत कक्ष,
वर्गाच्या बाहेरुन पुर्ण केले तु शिक्षणाचे लक्ष्य.
हेच होते धर्माच्या ठेकेदारांचे एकमात्र लक्ष्य,
विपरित परिस्थिति वर करुन मात गाठले लक्ष्य.
न डगमगता व्यवस्थेचा नाही बनला तु भक्ष्य,
तुझ्या जीवनाचे निश्चित होते शिक्षणाचे लक्ष्य.
आणी तु वाजवला ज्ञान प्राप्तीचा डंका,
या किर्तिमानाने समाज व्यवस्था झाली भंग.
बहुजना मध्ये पण आहे निरनिराळे ज्ञानाचे रंग,
हे तु दाखवुन दिले सर्वांन मात करुन कठीन प्रसंग.
बुध्दी नाही हा फक्त ब्राह्मणांचा नैसर्गिक ठेवा,
तुझे ज्ञान बघता सर्वांनाच वाटतो हेवा.
स्वर्ण जाती मध्ये नव्हता आणी आजही नाही,
तुझ्या तोडीचा कोणी ज्ञानसुर्य दिसत नाही.
तुझा वाचन करण्याचा वेगळाच होता गंध,
जगा पेक्षा वेगळाच होता हा अलौकिक छंद.
पन्नस हजारा पेक्षा अधिक होता ग्रंथ साठा,
ऐवढे पुस्तके वाचुन झाली तुझी मान ताठ.
तुझी पदवी सांगनारे अपुरे आहे शब्दकोष,
ज्याला जे गवसले तेच त्याने संबोधले.
तुझा ज्ञान विस्तार बघुनी उडते सामान्याचे होश,
त्यात त्या सामान्य मानवाचा काय दोष ?.
बोधिसत्व,परमपुज्य,महामानव,महापुरुष,
भारतरत्न,विश्र्वरत्न,ज्ञानरत्न,युगपुरुष.
विश्र्ववंदनीय,विश्र्वभूषण, प्रज्ञासुर्य,
क्रांतिकारी, युगप्रवर्तक, महाविव्दान, क्रांतिसुर्य.
थोर समासुधारक, विचारवंत, अभ्यासक, शास्त्रज्ञ,
कायदेपंडित,वकिल,संपादक, अर्थतज्ञ.
पत्रकार,बैरिस्टर, महानायक, ग्रंथप्रेमी,
अर्थज्ञानी, समतावादी, राष्ट्रवादी,सत्ताग्रही.
प्रभावी वक्ता, विद्दावीसंगी, शास्त्रज्ञ, समाजधर्मयोगी,
दलितांचा राजा, बोध्द धम्म पुनरुत्थानी, विश्र्वविभूति.
,तर्कशास्त्रज्ञ,समाजशास्त्रज्ञ,धर्मशास्त्रज्ञ मानववंशशास्त्रज्ञ,
इतिहासशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, शेतीतज्ञ घटनातज्ञ .
दुरदृष्टी विचारवंत, लेखक, तर्कशास्त्राकार, इतिहासकार,
शिक्षणाचा महामेरु, प्राध्यापक ,ज्ञानाचा अथांग महासागर.
जगाचा कोहिनूर हिरा, द ग्रेट इंडियन, द ग्रेट क्रिएटर,
आधुनिक भारताचे पितामह, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार.
कलमाचा बादशाह, कामगार नेता,महानेता,
महानविद्दार्थी,महान शिक्षक, मार्गदाता,मुक्तिदाता.
दलित उध्दारक,,राष्ट्रनिर्माते,राष्ट्रभक्त,
बहुजन हितचिंतक, धर्मनिर्पेक्ष घटना रचयता.
