मेघ
मेघ
हुलकावणी देणं सवय त्याचीच
जुळवणी क्रिया पण त्याची
दोन शब्दात अडकले जन
मेघांना राहिले नाही भान
कुठे मोठा, कुठे नाही
वाटेवरील वाटांना वाटच नाही
वाट बघणे असे हातात
थेंबातून तळे साचे अंगणात
मोठा बरसून पदरी निराशा
छोट्या थेंबांनी वाढती आशा
