मद्यधुंद
मद्यधुंद
काल माझ्या फुटपाथवर
एक माणुस होता पहुडलेला
गाडी अंगावरुन गेल्यावर
मला हाक देत होता
मोटर चढवून माणसानेच
चिरडून काढला त्याला
येऊन शुद्धीत तेव्हाच
फुटपाथवरुन पळून गेला
सा-या रस्त्यात रक्ताळलेला
देह दिसला पसरलेला
आता एकटा नव्हता तो
जखमीही होते सोबतीला
आरोपी गेला होता
त्याच्या घरात लपायला
पोलीस गेले होते
दुस-याच रस्त्यावर शोधायला
