मदत
मदत
कोणी साद घालता प्रतिसाद आपण द्यायचा असतो
कोणी मान दिला तर सन्मान आपणही ठेवायचा असतो
संकटाच्या वेळी कोण आहे न
पाहता मदतीचा हात पुढे करायचा असतो
कारण घेण्याबरोबर कोणाला काही देण्यात ही वेगळाच
आनंद असतो
आज आहे उद्या नाही सारे असतेच असे नाही
अवघा आहे ठेवा माणुसकीचा
उरत शेवटी काहीच नाही
फूल नाही फुलाची पाकळी,
एक हात मदतीचा, चांगल्या कामाला नेहमी पाठिंबा द्यायचा असतो
राग कुणाचा अन् का धरावा मनी
प्रेमाने माणसं जोडण्याची आवड असावी पैसा असतोच महत्वाचा जगण्यासाठी मात्र नात जपण्यासाठी थोडी सवय असावी
सुखाचा आभास दुःख मात्र खरे
ऊन सावलीचा हा खेळ सतत चालतच असतो
योग्य व्यक्तीला गरजे
नुसार मदत करावी
उपकाराची भाषा त्यात नसावी
माणसाने आत्मियतेने माणुसकी जपावी कारण अडचणीत असणाऱ्याला कुठलीही परतफेडीची
अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता मदत करण्यात
खर समाधान अन् आनंद मिळतो
