STORYMIRROR

Prashant Kadam

Romance

4.5  

Prashant Kadam

Romance

मदमस्त अदा !!

मदमस्त अदा !!

1 min
9.3K


तरतरीत तारुण्य तुझे अन्

ते सहज लाघवी बोलणे


खळखळूनी हासताना बघ

ते शुभ्र मोत्यांचे चकाकणे


ओठ ओठी दाबुनी हसताना

ते गालावरी कळीचे खुलणे


भोर त्या काळ्या बटीचे नभ

ते गोबऱ्या गालावरी रेंगाळणे


कटाक्ष तुझ्या नजरेचे अन्

ते लाज लाजून पाहणे


लगबगीने तुझे धावणे अन्

ते मुरडत मुरडत चालणे


साऱ्याच तूझ्या मदमस्त अदा

राहू देत निरंतर, हेच देवा मागणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance