STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

2  

Prashant Shinde

Drama

मौनं सर्वाथ साधनम...!

मौनं सर्वाथ साधनम...!

1 min
15.2K


मौन इतकं सुंदर असतं

की जे दिसत नसतं

ते पण

दिसतं तसं नसतं

हे आपोआप पटतं


काही काही

प्रश्न अनुत्तरित असणं

काही वेळा चांगलं असतं

तेव्हा मौन खूप

उपयोगी पडतं


घोडं अडतं तेव्हा

मौनंच

मोठ्या कौशल्याने

घोडं पुढं दामटतं


मौन साऱ्या

अडचणी दूर करत

ते अलगद

हाताला धरून

दर्या पार करतं


इतकंच काय

मौनं सर्वार्थ साधनम् हे

लीलया पटवून देतं


मौन खरंच इतकं सुंदर असतं

हे आता मला पटतं

जेव्हा जीवनातील

प्रत्येक गणित सहज सुटतं....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama