STORYMIRROR

Nivedita Kenge

Inspirational

4  

Nivedita Kenge

Inspirational

मैत्रीचा रंगमंच

मैत्रीचा रंगमंच

1 min
74

आयुष्य बहरत जातं हळूहळू, मैत्रीच्या रंगमंचावर

सरकत जात पुढे-पुढे, मैत्रीतल्या कलारंगांसह


कैक प्रसंगांचे साक्षीदार ठरलेले रंगकर्मी,

त्यांचे चेहरे बदलतात, भूमिका कायम राखत


प्रत्येक सुख-दुःखात सामील झालेले हे रसिक,

अथक साथ निभावतात, प्रामाणिक प्रतिसादासह


यांबरोबरच घडत जातो आयुष्याचा एकेक अंक,

अनेकविध कलारंगांचे उमलत जातात जीवनपुष्प


इथेच जीवश्च मैत्री होते, एक भव्य-दिव्य व्यासपीठ

अन् हरेक कलाकार जन्मतो, नवनव्या प्रवेशांसह



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational