मैत्री
मैत्री
दोन अक्षरी मैत्री
विश्वास वाढवे मनी
ढोंगीपणा न दीसे
एकमेका हात धरी
संकटसमयी आठवे
मित्र आपला खरा
त्यागी वृत्ती दाखवे
समस्या सोडवी बरा
मित्रांशिवाय खरा
जगात कोणी नाही
मैत्रीच्या नात्याला
कोणताच पर्याय नाही
सुखात ना साथ सोडी
ना दुःखात मागे राही
अनोळखी या नात्याला
मैत्रीचा सुगंध भारी
देई दाखले मैत्रीचे
जगात सगळीकडे
मित्राच्या खरेपणाविना
मैत्री नाही कोणाकडे
