STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

0  

Trupti Naware

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
968


मैञीचे निखळ हसणे

हास्यातले अवखळ भाव

भावातले शब्द गुंफूनी

काव्याची करून माळ

मोगरा सुगंधी बागेतला

वार्यास विनवी फार

त्या मैञीच्या वेगाने

पाखरे उडाली मग चार

उधळला गुलाल गगनात

वासंतिक आगमनात

रंगीत उत्सव मनाचा

मैञीच्या ढोल ताशात

अश्रुंचे पूर ही डोळ्यात

मैञीच्या सुखदुःखात

भाळले कोण कोणास

मथुरेच्या मनोहर कृष्णास

न कळली मीरा दुनीयेस

निष्काम ,निरपेक्ष,सालस

मैञ जीवांचे भावार्थ

दडले निखळ हसण्यात

हसणे शाब्दीक काव्याचे

शब्दातून फुलले भाव

माळेतून अर्थ निसटले

मैञीचे गवसले गाव.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational