STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
13.8K


मैत्री म्हणजे ... 

आपुलकीच्या वेलींवर  

हमखास उमलणारी फुलांची ताटी.

परस्परांवरील  विश्वासाची 

चिरंतन टिकणारी अतूट नाती.

मैत्री म्हणजे ...

निस्वार्थ प्रेमाचा अथांग सागर

भावोत्कट  शब्दसुरांचं

मनसोक्त झंकारणं  

मैत्री म्हणजे ...

प्रेमळ समज ,

तर कधी आदरयुक्त धाक 

चुकणा-या पावलांना

सावरणारी हाक. 

मैत्री म्हणजे ...

परस्परांचा कधी  न वाटे हेवा

उज्वल संस्कृतीचा 

अनमोल ठेवा. 

मैत्री म्हणजे ...

समरसता अशी की

साखरेत घुसळलेलं क्षीर.

एकमेकांची ओढ सदोदीत

कधी तहान भागविणार अमृततुल्य नीर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational