मैत्री आणि जुन्या आठवणी
मैत्री आणि जुन्या आठवणी
मित्रांची मैफिल ही अनोखी
आठवणी आहेत मनाशी
बिनधास्त साऱ्या जगाशी
साक्षीदार हे तारे लुकलुकती आकाशी |
मस्तीची शाळा हि रोज भरायची
तिसऱ्या तासात पोट सगळ्यांची भरायची
आज हा तर उद्या तो मनाला आवडायचा
3 वेळा बेल वाजली तरी आमचा वर्ग बाहेर असायचा |
जगण्याची खरी मज्जा तेव्हा यायची
त्या Lollipop च्या मागे अक्खी रांग उभी असायची
गांडूळ डान्स" करत करत वर्ग पुढे यायचो
चुकी नसताना पाय धरून उभे रायचो |
आठवणीच्या क्षणाचे दिवस आता भरावे
खंत ना कुठली ह्या मनाशी उरावे
राहील शेवटची इच्छा या मैत्रिणीसोबत
पुन्हा एकदा आयुष्य नक्की लाभावे |

