STORYMIRROR

Ankita Akhade

Others

3  

Ankita Akhade

Others

का प्रत्येक कवी असतो असा

का प्रत्येक कवी असतो असा

1 min
252

का प्रत्येक कवी असतो असा 

तोंड असूनही न बोलणारा 

हाताने फक्त लिहिणारा 

मनाला न पटणाऱ्या गोष्टी 

सुद्धा पटवून सांगणारा 


डोळ्यात_डोळे घालून न बघणारा 

पण कोणासाठी तरी त्या 

डोळ्यातून पाणी काढणारा 

का प्रत्येक कवी असतो असा 


स्वतःच देहाला इजा देणारा 

आणि स्वतः बरा करणारा 

का प्रत्येक कवी असतो असा 


ज्या चार ओळी तो लिहितो 

ते सुद्धा स्वतःसाठी न लिहिणारा 

का प्रत्येक कवी असतो असा 


Rate this content
Log in