STORYMIRROR

Ankita Akhade

Romance Inspirational

3  

Ankita Akhade

Romance Inspirational

जीवन शाळा

जीवन शाळा

1 min
227

तुला आठवते का आपली शाळा 

तो पांढरा खडू आणि काळा फळा! 

कबड्डी खेळायचो आपण मिळून साऱ्या जनी 

आता आठवले तरी डोळ्यात येते पानी 

कंटाळा तर सगळ्यात भरलेला होता

तरीही थोडा अभ्यास हा उरलेलाच होता

इतिहासाच्या तासाला झोपायची मज्जाच वेगळी होती 

भूगोलाच्या तासाला पुस्तकं कोणाकडे नसायची 

मराठीत ला काना मात्रा कधी समजलाच नाही 

संगीताचा सुर कधी गाताच आला नाही 

गणित विज्ञान कधी डोक्यात शिरलेच नाही

ओरडा तर रोज खायचो शिक्षकांचा 

तरीही लाज थोडीही उरली नाही 

शाळेचा तो फळा होता किती बरा 

चुकले असले काही तर पुसायचो भराभरा

जीवनातही असा एक फळा हवा होता 

आपण केलेल्या चुकांना आलं असतं पुसून टाकता.....


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance