STORYMIRROR

Ankita Akhade

Others Children

3  

Ankita Akhade

Others Children

आठवतील ते दिवस पुन्हा..

आठवतील ते दिवस पुन्हा..

1 min
226

कार्यक्रम असेल तर फक्त मागे जाऊन बसायच

एका एका जणांना आम्ही खूप छळायचो

ओरडल्यावर हसायचे सर्व जण आमच्यावर 

तेव्हा पण आम्ही स्वतःवर हसायचो

मार भेटल्या वर तात्पुरतं "अा उ" करायचो

डबा खायला नेहमी "लास्ट बेंच"वर बसायचो

चूक नसेल तरी मारायची मज्जाच वेगळी होती 

प्रत्येक वाक्यात शिवी ही ठरलेली होती 

सकाळी 7 चा alarm लावायचो पण 9 लाच उठायचो

शाळेचा अभ्यास नंतर पहिला class चा करायचो 

सर बाहेर गेल्यावर बोलत बसायचो

कोण ही आल तर अभ्यास कर म्हणायचं 

शिक्षकांना कधीच आदर देत नव्हतो ‌

कचरा केल्यावर तो दुसऱ्याच्या बॅगेत टाकायचो 

मॅडम च्या वह्या कधीच पूर्ण करत नसायचो 

परीक्षे च्या आधल्या दिवशी अभ्यासाला बसायचो 

5 दिवस उरले आहेत तरी अभ्यास झाला नाही 

शाळेत आल्या शिवाय आम्हाला करमतच नाही 

शिक्षकाचां ओरडा खाल्ल्या शिवाय दिवस 

जात नसायचा 

अभ्यासाच्या वेळी नेहमी कंटाळा असायचा

आठवणीत राहू का तुमच्या माहित नाही

पण शाळेची आठवण काढल्या शिवाय राहणार नाही

अभ्यासाचा कंटाळा आम्हाला पूर्वी पासून 

पण शिक्षकांवर प्रेम केलं मनापासून 

   

  आमची मैत्री अशी नाही ती 10 ओळीत पुरेल 

   त्यासाठी 10 पुस्तक पण कमी पडतील ...


Rate this content
Log in