Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Akhade

Others

4  

Ankita Akhade

Others

आमच्या काळात नव्हतं अस काही

आमच्या काळात नव्हतं अस काही

1 min
228


आमच्या काळात नव्हतं अस काही बाई 

कुठे घटस्फोट आणि कुठे दुसर लग्न 

उरलेल्या शिळ्या भाकरीच उकडलं करून खान | 


कुठे ते मोठे हॉटेल आणि कसले ते बार 

आमच्यात कधीच नव्हती जित आणि हार |


कसला तो फुटबॉल आणि कसली हॉकी 

भातुकलीची आणि विती दांडू खेळायची मज्जाच वेगळे होती | 


"सोळावं वरीस धोक्याच"म्हणताना

सतराव्या वर्षी मांडीवर बाळ असायचं 

खिशात पुरेसा पैसा नसला तरी 

मन मात्र समाधानी असायचं | 


सुट्टीच्या दिवशी बापा बरोबर कामाला जायचं 

अर्धी भाकर कमी खाल्ली तरी 

चेहऱ्यावर आनंद अफाट असायचं | 


शाळेच्या गणवेशाला ठिगळ असायची 

परिस्तिथी मुळे दगडा खाली हाथ होते 

पण तेव्हाची गोष्ट काही वेगळी होती 

गोष्ट काही वेगळी होती | 


Rate this content
Log in