मायभूमी (अष्टाक्षरी)
मायभूमी (अष्टाक्षरी)
सुफलाम मायभूमी
शूरवीर पोलादाची
गाथा इथेच फुलते
नित्य साई समर्थांची
रामायण महाभारत
साक्ष तूच आम्हा देशी,
थोर संत महात्म्यांची
लीला शोभे तुझ्या कुशी
पाहे स्वराज्य तोरण
स्वप्ने शूर शिवाजीची
माय देखिले कौतुक
ज्योत मशाल क्रांतीची
तोडे वीर शौर्यत्वाने
बेड्या गुलामगिरीच्या
सत्ययुग कलयुगे
स्मृती त्या अनुभवाच्या
इतिहास पुर्णत्वाचा
तृप्ती सुगंध मोहरे
ज्ञानदेव, तुकोबाची
गाथा अमृत पाझरे