माय
माय


भूक-तहान सोसून
माय शेतात राबते ;
सर्जा- राजाच्या संगतीने
शेत मशागत करते.
अर्ध्यावर डाव मांडुनी
बाप तिला सोडून गेला ;
साऱ्या कर्जाचा बोजा मग
मायच्या डोईवरी आला.
पिकविमा मिळण्या माय
बँकेचे उंबरठे झिजवते ;
शेतमाल विकाया बाजारी
उन्हांत अनवाणी हिंडते.
निसर्गाच्या दुष्टचक्रात माय
आमचं भविष्य शोधते ;
कष्ट , हाल-अपेष्टा सोसून
भार कुटुंबाचा पेलते.
वीतभर पोटासाठी माय
भाकरीचा चंद्र शोधते ;
तिचं त्याग- समर्पण
साऱ्या जगाला दिसते.