STORYMIRROR

Sunjay Dobade

Tragedy

4  

Sunjay Dobade

Tragedy

अश्रू

अश्रू

1 min
19.9K


माझे अश्रू पुसणं

नव्हतंच त्यांना शक्य

आणि इच्छाही नव्हती कुणाची

तरीही त्यांनी केला तसा देखावा

कारण माझ्या अश्रूवरच

त्यांना पेटवायचं होतं पाणी

करायचा होता चक्का जाम

द्यायची होती भारत बंदची हाक

जाळपोळ लुटालुट दंगे

सगळं काही चाललं होतं

माझ्या अ़श्रूंचा हवाला ठेवून


अचानक माझ्या अश्रूंचा

इतका पुळका का आलाय त्यांना

हे न समजण्याइतका

मी दुधखुळा तर नाही ना?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy