माय मराठी
माय मराठी
माय मराठी मायबोली
किती मी गुणगान करू
साऱ्यांचीच असे ती बोली
म्हणूनच तिची कास धरू
महाराष्ट्र माझा रांगडा
तयाला मुजरा मराठीचा
मायबोली मराठीचा पगडा
मान करू त्या मराठीचा
ओव्या, कीर्तने, अभंग
काय नसे मराठीत
नाते त्यांचे आहे अभंग
रुजलीत मूल्ये या भाषेत
कितीही गा गोडवे
त्या पाश्चात्य भाषेचे
नाही ओ दिमाख
माझ्या मराठीपरी कोणाचे
मायबोली माझी मराठी
हीच खरी आत्मीयता
नको सोडू तिचा हात
हीच असे तुमची नम्रता
