STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

2  

Sunita Ghule

Inspirational

माय मराठी

माय मराठी

1 min
883


महाराष्ट्रभूमीची अस्मिता

माय मराठी मातृरूप मज

श्वास मराठी,ध्यास मराठी

लावण्याची खाण मराठी


लळा जिव्हेला लागता

गळी मधूर बाेल मराठी

अलंकार वृत्त साज ल्यालेली

स्वरचिन्हांनी सजलेली

अर्थपूर्ण म्हणी वाक्प्रचार

भाव मनीचा खोलते ही!!


वेदनेवर घालते फूंकर

शब्द शस्त्राने गारद करते

आगळे वेगळे हिचे तंतर

क्षणात पुसते अंतर मराठी

देवादिक राजांनी केला सन्मान


अमृताहुनी गोड उच्चार

शिवतलवारीचे तेज मराठी

संत सज्जनांचे ओज मराठी

ओढ परभाषेची लागता

विकास खुंटतो मराठीचा

शिक्षण, व्यापार ज्ञानासाठी

वापरून सन्मान करावा तिचा

राजभाषा दर्जा दिला आहे


कायदयाची भाषा करा हो मराठी

प्रशासन चालवू मातृभाषेतच

तेव्हा जिंकेल जगी मराठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational