माय मराठी
माय मराठी
काव्य प्रकार - मधुदीप
ती
भाषा
आमुची
एक वसा
तो अभिमान
मनात
ठसा...
मराठी भाषा असे, लाभलेले वरदान
मनात प्रेम, जपली निष्ठा अपार
माझी ती वाचा, विचार मराठी
माया असे अपरंपार
मातृभाषा, जननी
संपन्न फार...
ते
दिले
मातेने
मज दान
जपते मनी
शब्द शब्द
विचार
छान...
लिहीते सुंदर अक्षर, ते वळणदार
डौल तियेचा, असे वेगळाच छान
काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार
दागदागिने वाढे मान
कळे आशयघन
लाभले ज्ञान...
