STORYMIRROR

Pranjali Kalbende

Inspirational

3  

Pranjali Kalbende

Inspirational

माय माऊली

माय माऊली

1 min
161

रक्त आटलं तरीही

कष्ट करीत राहते

माय माऊली सदैव

लेकरास गोंजारते....१


सुख तिचे लेकरात

स्वप्न त्याचेच पडते

दूर देशी गेलेल्याला

नयनात ती जपते....२


कंठ दाटून येतोही

हुंदक्याला आवरते

अपत्याच्या सुखासाठी

विरहाला स्विकारते....३


मन तिचे नाजुकसे

धीर खंबीर करते

हतबल होता मुल

धैर्यशील बनवते.....४


माय माऊली प्रत्येक

गुरू असे लेकराचा

संस्काराची शिकवण

ठेवा देते आयुष्याचा....५



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational