माय माऊली
माय माऊली
माय माऊली माझी आई
दुःख तिच्या पदरात घेई
सुख आम्हा देत राही
विठूमाई, माझी रखुमाई!!धृ!!
कितीदा जन्म घ्यावे
तुझ्याच पोटी आई
परमेश्वराशी ओळख
फक्त तुझ्यात आई!!१!!
जगाशी नाही कोणते नाते
तुझ्यात जग सामावून आहे
हात जोडतो तुला आई
यातच आमचे भाग्य आहे!!२!!
दुःख सहन करून माई
सुख आम्हा देत आहे
स्वतः राहील उपाशी पण
दोन घास आम्हा भरवत आहे!!३!!
अपुरा आहे जन्म आई
तुझी सेवा करण्याचा
प्रत्येक क्षण व दिवस
तुला आनंदी बघण्याचा!!४!!
मागणे सुखाला हे सुखाचे
नसे दुःखाचे जाळणे
भवती सुखाचे हे मागणे
फक्त तुझ्यासाठी आई!!५!!
कोणीही नाही घेऊ शकत
तुझी जागा आमच्या जीवनात
कारण तुझ्यासारखे दैवत
नसेलच कोणी या जगात
नसेलच कोणी या जगात!!६!!