माय बहीण
माय बहीण
द्वेष बाजूला सारून
स्वार्थ बाजूला सारून।
बघ विचार करून मानूसकीला हेरून।।
का?.. माय-बहीन हरवीली, ऊदरात लेकी मारून।।धृ।।
आईचा लळा तुला
बहीनीची राखी प्यारी।
पत्नीची साथ न्यारी
आजीची थाप भारी।।
प्रेयसीला पाहून गेला होता भारून।।१।।
बापाला ओझं नाही
मुलगी कुळाची शान।
माय-बाप कसे असतील
मुलीचेच तिकडे ध्यान।।
घर सोडताना नवरी रडे बाबा-बाबा हाक मारून।।२।।
मी म्हणत नाही
कठोर सारी पोरं।
मुलगीच सांभाळून
असते मायेची डोर।।
तिच्या एका हाकेसाठी शिवकवी धन्य जग हारून।।३।।
