STORYMIRROR

Shashikant Shandile

Tragedy

2  

Shashikant Shandile

Tragedy

माती

माती

1 min
13.9K


भिजल्या अंगाने दूध पाजत

अंकुरल्या बिजा श्वास घालते

प्रेमाने हात फिरवित बाळाला

कुशीत घेऊन शांत नीजते

अंगावर वखर नागरटीचे घाव

यूरियाने तिचं जिव गुदमरते

फवारणी कितीतरी औषधांची

दररोज मरन्यास भाग पड़ते

स्वार्थापाई सर्वांनी छडले तिला

ती गुमान आपला धर्म पाडते

अशी लाखमोलाची ती माती

पोरांच्या पोटासाठी धडपडते

स्वार्थ न मोलतोल कसला मनी

निस्वार्थ मनाने ती अन्न उगवते

आई म्हणवत्या याच मातीला

आजकाल पोरं पैशात तोलते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy