STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Inspirational

2  

Mahesh Raikhelkar

Inspirational

"मानवी इच्छा"

"मानवी इच्छा"

1 min
2.8K


परीक्षेत चांगले मार्क मिळावेत ही एक इच्छा

उच्चं शिक्षणासाठी चांगले कॉलेज मिळावे ही एक इच्छा

 चांगले करीअर घडावे ही एक इच्छा

मोठया पगाराची नोकरी मिळावी ही एक इच्छा

सुंदर-सुस्वभावी बायको मिळावी ही एक इच्छा

सुदृढ मुलं-बाळ व्हावीत ही एक इच्छा

परदेशवारी व्हावी ही एक इच्छा

स्वतःचे घर असावे ही एक इच्छा

घरासमोर चार चाकी असावी ही एक इच्छा

घरात सर्व प्रकारची सुबत्ता असावी ही एक इच्छा

शरीर-प्रकृती उत्तम असावी ही एक इच्छा

मनःशांती मिळावी ही एक इच्छा

कोर्ट-कचेरीची मागे झंझट नसावी ही एक इच्छा

समाजात नाव लौकिक मिळवावा ही एक इच्छा

प्रेमळ मित्रपरिवार असावा ही एक इच्छा

आपुलकीची नाती-मंडळी असावीत ही एक इच्छा

मुलांनी शिकून मोठे व्हावे ही एक इच्छा

भरपूर संपत्ती गाठी असावी ही एक इच्छा

जावई-सून चांगली मिळावीत ही एक इच्छा

नातवंड-पतवंड अंगावर खेळवावीत ही एक इच्छा

मुलांनी म्हातारं पणी चांगले सांभाळावे ही एक इच्छा

शेवटी चांगले मरण यावे ही एक इच्छा

काही पूर्ण, काही अपूर्णच राहतात

मानवी जीवनातील इच्छा

हीच तर नसेल ना विधात्याची  इच्छा ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational