STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

मानवाची प्रगती

मानवाची प्रगती

1 min
674

।। मानवाची प्रगती ।।


पशू-पक्ष्यांचा शिकार करून

आदिमानव राहत असे जंगलात

मिळाली नाही काही शिकार तर

कंदमुळे खाऊन जीवन जगत


घनदाट जंगलात न राहता

नदीकाठावर त्याची वस्ती

जगण्यासाठी हवे म्हणून

जिथे पाणी तिथेच बस्ती


अंगावर नव्हते कपडलत्ते

वापरत होते साल झाडांची

काळजी होती त्यांना फक्त

आपले सर्वांग झाकण्याची


निवाऱ्यासाठी नव्हते घर

नव्हते कोणते अंथरण 

आभाळ त्याचे छत होते

तर जमीन त्याचे अंगण


अग्नीचा शोध लागला अन

मानवाची सुरू झाली प्रगती

दगड गेले घरंगळत अन

चाकाला मिळाली वेगाची गती


अन्न, वस्त्र आणि निवारा

याची गरज भागू लागली

मानव प्रगत होत गेला

त्याची आशा वाढू लागली


हळूहळू त्याचे जीवन आत्ता

एका रोबोटसमान झाले

आदिमानवाचे जीवन जगणे

आत्ता इतिहासजमा झाले


निसर्गाला पूर्ण विसरून

जरी मानवाने केली प्रगती

उपकार विसरू नये नसता

जीवनाची होईल अधोगती



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational