माणूस
माणूस
कुठून तरी कुठेतरी जात असतात असंख्य माणसांचे समूह
कारणानी की विनाकारण समजतच नाही कधीही
फेर धरून नाचत असतात कुठेही आणि कसेही
खरच कोणाला गरज पडली तर क्षणार्धात गुडुप होतात कुठेतरी
ठिणगी पडली संघर्षाची तर गोळा होतात लगोलग
अपघात घडला,तर चित्रीकरणात व्यस्त असतात रस्त्यावर मधोमध
कांगावखोर माणसांचा समूह सतत लक्ष वेधतो समाजाचे
आंदोलनात भाग घेतो फलक घेऊन मागण्यांचे
काही असतात संधिसाधू नी स्वार्थी
आपलीच पोळी भाजून घेतात नसते कशाची भ्रांत
माणसांच्या समूहाची वेगळीच असते मानसिकता ,कधी
कोणाला उचलून धरतील,कशाचीही असते शक्यता
माणसातील पशु एकमेकां आडून करतात वार
मी त्यातला नाही, हा असतो त्यांचा आव
काही असतात शांत
सोडवतात प्रश्न समाजाचे, खरेच बाळगतात खंत
काळा मागून काय लोटतो तरीही माणूस तसाच राहतो
समूहातील 'खरा' माणूस आपल्यालाच शोधावा लागतो
