STORYMIRROR

Vinita Kadam

Inspirational

4  

Vinita Kadam

Inspirational

माणूस

माणूस

1 min
337

"माणूस" म्हणून जन्मुनी

"माणूसकीने" नाही जगला

"स्वार्थपूर्ण" आयुष्यात

"निरर्थक" अर्थाने गांजला...


"अभिमानी" लाटेखाली

कोरडेच "चिंब" भिजला

"मन लहरींसवे" मनमौजी

"मानवतेच्या" खेळी थिजला...


"बर्फासम" थंड तरी

माणूस म्हणून पिघळावं

"खडकावर" आदळूनही

"माणूसकीने" खिदळावं...


मावळतीच्या "मित्रासंगे"

"किरणासम" उगवावं

"क्षितिजावरील" पक्ष्यांसवे

"गगनात" विहरावं...


उसळलेल्या "लाटेला"

"सत्संगाने" शांत करावं

हरेक "स्वभाव" लहरींना

"माणूसकीने" कवेत घ्यावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational