STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Tragedy

माणूस संपून जातो अन प्रश्न

माणूस संपून जातो अन प्रश्न

1 min
270

कुठवर जगावं हे बेगडीपणाच वागणं ?

ओठात एक अन पोटात वेगळं

नाहीच जमणार खोटं - खोटं बोलणं

मतलबी हास्यातुन काम आपलं काढणं


कुठवर जगावं हे दे दान सुटटे ग्रहण ?

टीचभर पोटासाठी सदा नी कदा भिक्षांदेही

कुठवर शोधावं अनवाणी पायांन ...

घरटं इवलंस अन ते मनातलं आभाळ


लुटारूंची टोळी नाक्या - नाक्यावर तरीही

अपयशाचं खापर आपल्याच माथ्यावर

नियती म्हणावं की आपलंच कर्मभोग असले

का म्हणून आपल्याच भाळी लाचार जगणं ?


कुठवर जगावं हे दिशाहीन जिणं ?

कुणासाठी आणि का म्हणून भोगावी ?

कधीच न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा

फेकून द्यावीत खुशाल ही देहाची लक्तरे


प्रश्न अनेक उत्तर मात्र सापडत नाही

न सुटणारे प्रश्न डावलून पुढे चालावं तर

ते आणखीनच उग्र रूप धारण करतात

माणूस संपून जातो अन प्रश्न मात्र अधांतरी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy