STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

2  

Pandit Warade

Tragedy

माणूस शोधतो मी

माणूस शोधतो मी

1 min
14.5K


तुडवीत पत्थरांना का उगाच चालतो मी ।

नकळे मनास माझ्या कोणास शोधतो मी ।।

समजून फुले गुलाबी जातेच तुडवितो मी ।

फसव्या या मृगजळात कस्तुरीस शोधतो मी ।।

बघतांना नभात तारे ध्रुवास पाहतो मी ।

जगताना जीवन, माझे अस्तित्व शोधतो मी ।।

गर्दीत सोयऱ्यांच्या स्वार्थास पाहतो मी ।

निरपेक्ष, निस्वार्थ प्रेमास शोधतो मी ।।

मन सैरभैर, जेव्हा पशूताच पाहतो मी ।

कळपात श्वापदांच्या माणूस शोधतो मी ।

       


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy