STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

4  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

माणुसकीचे वाण

माणुसकीचे वाण

1 min
796

गाठीभेटी आप्तेष्ठांच्या

स्नेहबंध हे प्रेमाचे....

आली मकरसंक्रांत

घेउनी दिन सुखाचे ।।


पैठणीतील लावण्य

चुडे शोभती हातात....

सौभाग्यवतीच लेणं

मंगळसूत्र गळ्यात ।।


हळदी कुंकूचा मान

भाळी शोभून दिसतो....

पतीराजास पाहता

चेहरा स्त्रीचा खुलतो ।।


हलव्याच्या दागिन्यांने

नववधू ही शोभते....

बाळाची होता लूट

सुख मुखी दिसते ।।


तीळ गुळाची ही गोडी

प्रत्येक नात्यात यावी....

हातात हात गुंफून

नाती अधिक जुळावी ।।


संक्रमण सूर्याचे हे

शुभ होवो सर्वार्थाने.....

प्रगती पतंग सदा

उडो नभी आनंदाने ।।


दे घे करू हलव्याची

लुटू "माणुसकी"वाण....

सुबुद्धी सर्वांना लाभो

जाऊ सर्वेशा शरण।।

संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational