माणुसकीचे मोल
माणुसकीचे मोल
विकली जातात, इथे आज माणसे
माणुसकी झाली, मात्र कवडीमोल !
माणसा- माणसात वाद भयंकर
संवाद मात्र इथे ठरतो फोल !
फेसबुक नि व्हॉट्सॲपवरती, खुप होते हाय, हॅलो
रिअल लाईफ मध्ये मात्र, माणसे झाले अबोल !
नात्यामध्ये इथे मात्र, दिसते फक्त जवळीकता
आपुलकीचा गंध मात्र, आटून गेला खोल !
काळासोबत घडतात इथे सारे बदल
पण माणुसकीच्या विचारांचा, ढळला मात्र तोल !
कुणा कळेल का? या जगती लोकां
पैशाच्या या श्रीमंतीपेक्षा, माणुसकीचे मोल !
