माणुसकी : खरा धर्म
माणुसकी : खरा धर्म
माणसाने सोडली माणुसकी
काय करावे त्याने ज्याने माणसाला घडविले....
विठ्ठल पांडुरंग उभा दोन हात ठेऊनी कटेवरी,
कळेना त्यालाही, सोडली माणसाची चिंता....
जातपात, अंधश्रद्धेचा मांडला कहर,
धर्माचा मांडला काळाबाजार...
का कळेना कोणाला आपण सगळेच याला जबाबदार.....
रक्ताने जपा माणुसकी, सोडू नका तिला,
आयुष्यभर ठेवा माणुसकीचा विचार मनात....
शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला धावेल,
नात्यात काही बंध राहणार नाही....
माणूस असो कोणत्याही धर्माचा, पंथाचा...
या जगात सर्व असतील समान,
ना कोणता दुजाभाव, ना कोणता भेदभाव,
असेल फक्त सर्वधर्मसमभाव....
धन्यवाद
जय हिंद.....