STORYMIRROR

kishor zote

Tragedy

2  

kishor zote

Tragedy

माणुसकी हरवली ( अष्टाक्षरी )

माणुसकी हरवली ( अष्टाक्षरी )

1 min
14.2K


अपघात तो घडता

नाही मदत मिळाली

फोटो काढण्यात दंग

माणुसकी हरवली.....१

पहा रुग्णवाहीकेची

वाट अडून धरली

झाली कानाने बहिरी

माणुसकी हरवली....२

तपासण्या करताना

धावपळ किती केली

पहा टक्केवारी मधे

माणुसकी हरवली....३

आधी करा पैसे जमा 

तेंव्हा किंमत कळली

झाला सर्वश्रेष्ठ पैसा

माणुसकी हरवली.....४

शोधी रडण्यास खांदा

आता नाही कोणी वाली

होती दूरावले नाते

माणुसकी हरवली.....५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy