मान सन्मान
मान सन्मान
स्वतःसाठी जगताना
का विसरे तू हे भान
कधीतरी लढ आता
घेण्या मानसन्मान
हीनतेची ही भावना
नको मनात जागवू
तुझ्यासाठी तूच आहे
नको स्वतःची जिरवू
लढ आता स्वतःसाठी
अत्याचारा विरोधात
दाखवून दे सर्वाला
तुझे अस्तित्व जगात
प्रेमाची सदा तू मूर्ती
कवींची बने प्रेरणा
ममतेची गाजे कीर्ती
का मिळे अवहेलना
मिळव मान-सन्मान
बनुनी स्त्रियांची ढाल
लढ तुझ्या रक्षणास
दाखवूनी रुद्र काल
